मोरेवाडी ग्राम

क‌रवीर तालुक्यातील‌ मोरेवाडी हे गाव‌ कोल्हापुर शह‌रा ल‌ग‌त‌च‌ आहे. या गावात‌ मोरे आड‌नावाची कुटुंबे जास्त‌ आस‌ल्यामुळे या गावाला मोरेवाडी या नावाने संबोध‌ले गेले. आज‌ प‌र्यंत‌ म‌हाराष्ट्र शास‌नाचा संत‌ गाड‌गे बाबा ग्राम‌ स्व‌च्छ‌ता आभीयाना अंत‌र्ग‌त‌ क‌रवीर तालुक्यात‌ दुस‌रा नंब‌र मिळ‌व‌ला आहे. त्याच‌ प्रमाणे भारत‌ स‌रकारचा निर्म‌ल‌ ग्राम‌ पुरस्कार मा. राष्ट्रप‌तींच्या ह‌स्ते प्रथ‌म‌ पुरस्कार मिळ‌व‌लेला आहे.

गावाचे जागृत‌ देव‌स्थान‌ भैरव‌नाथ‌ देवाल‌य‌ असुन‌ वर्षातून‌ एक‌दा यात्रा भ‌रव‌ली जाते. भैरव‌नाथ‌ देवाल‌याचा ज‌न्मोत्स‌व‌ मोठ्या प्रमाणात‌ साज‌रा केला जातो. गावात‌ इत‌र देवाल‌ये आहेत‌ त्या पैकी ख‌डीचा ग‌ण‌प‌ती पंच‌क्रोशी म‌ध्ये प्रसिध्द‌ आहे. त्याच‌ ब‌रोब‌र द‌त्त‌ मंदिर, स्वामी स‌म‌र्थ‌, म‌हादेव‌  मंदिर, ह‌नुमान‌ मंदिर, जैन‌ मंदिर, म‌शिद‌ ही देव‌स्थाने आहेत‌.  गावातील‌ स‌र्व‌ जाती ध‌र्माचे लोक‌ एक‌त्र येउन‌ उत्स‌व‌ साज‌रे क‌रतात‌.

गावा म‌ध्ये एकुण‌ 25 त‌रुण‌ मंड‌ळे व‌ महिला मंड‌ळा मार्फ‌त‌ ग‌णेश‌ उत्स‌व‌, न‌व‌रात्र उत्स‌व‌, शिव‌जयंती, द‌त्त‌ जयंती, ह‌नुमान‌ जयंती, म‌हाशिव‌रात्र, स्वामी स‌म‌र्थ‌ पाल‌खी सोह‌ळा इ. उत्स‌व‌ साज‌रे केले जातात‌ व पारंपारीक‌ प‌ध्द‌तीने क‌लेचे गुण‌ जोपास‌ले जातात‌. याच‌ ब‌रोब‌र रांगोळी स्पर्धा स्व‌च्छ‌ घ‌र स्पर्धा, झिम्मा – फुग‌डी स्पर्धा, उखाणे – पारंपारीक‌ गाणे स्पर्धा, स्व‌च्छ‌ ज‌नाव‌रे – गोठा स्पर्धा, मॅराथोन‌, श‌रीर सौष्ट‌व‌ स्पर्धा व‌ बैल‌गाडी स्पर्धा इ. स्प‌र्धे द्वारे म‌नोरंज‌नाचा कार्य‌क्रम‌ आयोजीत‌ केले जातात‌.